सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाचे पाण्यासाठी ठिय्या आंदोलन.. प्रशासनाची धांदल

नगरसेवक राजू बेग हे रिकामी घागर घेत पाणी प्रश्नाविरोधात पालिकेत ठिय्या आंदोलन करीत आहेत.
collage (56).jpg
collage (56).jpg

सावंतवाडी : लोकप्रतिनिधींना आपल्या प्रश्नासाठी आंदोलन छेडावे, लागण्याची वेळ येते यात नवल नाही मात्र, सत्ताधारीच पक्ष असलेल्या नगरसेवकाने जर आंदोलन छेडले तर ही गोष्ट मात्र नक्कीच नवलाची म्हणायला हरकत नाही. 

पालिकेचे अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग हे रिकामी घागर घेत पाणी प्रश्नाविरोधात पालिकेत ठिय्या आंदोलन करीत आहेत. कुठलीही कल्पना नसताना नगरपालिकेच्या दारातच त्यांचा हा पवित्रा पाहून प्रशासनाची धांदल उडाली. बेग हे माठेवाडा, बाहेरचावाडा भागाचे ते नगरसेवक आहेत. बुराण गल्ली माठेवाडा, दत्तनगर भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले.

त्यानी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. २४ तास पाणीपुरवठा करण्याचा टेंभा  मिरवणारी पालिका नागरिकांना दोन तास पाणी देण्यास अपयशी का ठरली, हा प्रश्न मार्गी लावावा या उद्देशानेच हे बेग यांनी आंदोलन छेडले होते. या आगळ्या वेगळ्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या आंदोलनाची मोठी चर्चा मात्र शहरात रंगली होती.

हेही वाचा :'जलयुक्त'मध्ये पाणी मुरले की पैसे हे स्पष्ट होईल...
 
मुंबई :जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली होती. आता आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टि्वट केलं होतं. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल.ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला.तब्बल ९६३३ कोटी रूपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com